अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना सदृश लक्षणे असलेल्या महिलेचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,9 जुलै 2020 :  कोरोना सदृश लक्षणे असलेल्या नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील एका वयोवृद्ध महिलेचा (वय 70) मृत्यू झाला असून या महिलेच्या संपर्कातील तिघांना कोव्हिड केअर सेंटरमध्ये हलविण्यात आले आहे.

बुधवारी भानसहिवरा येथील 70 वर्षे वयाच्या महिलेला सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असल्याने नेवासा फाटा येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले असता तिचा वाटेत मृत्यू झाला.

सदरच्या स्थानिक डॉक्टरांनी ही माहिती शासकीय यंत्रणेस कळविल्याने त्वरित तहसीलदार रुपेश सुराणा व तालुका वैद्यकीय अधिकारी अभिराज सूर्यवंशी यांनी भानसहिवरा येथे भेट देऊन सदर महिलेच्या नातेवाईकांसमोर अंत्यविधी केला.

सकाळी सात वाजता या महिलेला दवाखान्यात आणले जात असताना तिचा मृत्यू झाला होता. तसेच सदरची महिला काही दिवसांपूर्वी पुणे येथून आली असल्याचे समजल्याने प्रशासनाने काळजी म्हणून तिच्या संपर्कातील तीन जणांना नेवासा येथील कोव्हिड सेवा केंद्रात आणले व त्यांचे स्त्राव घेऊन नगरला तपासणीसाठी पाठविण्यात आले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24