अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- खासगी ठिकाणी केलेल्या तपासणीत संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील एक जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला होता.
प्रशासनाने सावध भूमिका घेत त्याच्या स्त्रावाचे नमुने पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठविले आहेत. तो रुग्ण मयत झाल्याचे उघडकीस आले आहे.
मयत झाल्यानंतरच तो व्यक्ती करुणा पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
तूर्तास संगमनेर शांत व सुरक्षित रहावे म्हणून प्रशासनाने कंबर कसली आहे. धांदरफळ परिसर सील करण्याचे नियोजन सुरू केले आहे.
दरम्यान त्या व्यक्तीच्या सानिध्यात असणाऱ्या काही व्यक्तींच्यादेखील तपासण्या कराव्या लागणार आहेत.
संगमनेर तालुक्यात अद्यापर्यंत आठ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. मात्र , डॉक्टरांच्या यशस्वी प्रयत्नानंतर त्यांना सुखरूप घरी पोहचण्याचे भाग्य लाभले.
तर तालुक्यात पोलिस, महसूल , आरोग्य व नगरपालिका यांच्या अथक प्रयत्नामुळे पुढील प्रादुर्भाव होणे टळला आहे.
कालच ( दि . 6 ) कोरोना बाधित असलेले चार तबलीगी निगेटिव्ह होऊन तालुक्यात आले. तालुका कोरोनामुक्त झाल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला.
मात्र , आज पुन्हा धांदरफळ परिसरात एक नवा संशियत मिळून आला आहे. विशेष म्हणजे सदर व्यक्ती मयत झाला आहे. त्या व्यक्तीला मधुमेहाची लागण होती, असे सांगितले जात आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®