अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर :- पारनेर तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या खटल्याची सुनावणी अवघ्या २ महिने आणि ६ दिवसात पूर्ण झाली. परप्रांतीय आरोपी मनोज हरिहर शुक्ला (युपी) याला २० वर्षांची कोठडी आणि १ लाखाचा दंड. प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीकांत आणेकर यांनी सुनावली.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि,पिडीत मुलीचे आई – वडील हे चमारा चौतारा, डोटी, जिल्हा शेटी, काटमांड, नेपाळ येथील रहिवासी असुन रोजगाराच्या निमीत्ताने पारनेर तालुक्यात आले होते. पिडीत मुलीचे वडील हे येथील हॉटेल यशवंत मध्ये आचारी म्हणून काम करीत होते व भरत नामदेव पठारे,पारनेर यांचे मळ्यातील खोलीमध्ये त्यांची पिडीत मुलीसह राहत होते.
घटनेच्यावेळी पिडीत मुलगी ही इयत्ता २ री मध्ये शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी सकाळी पिडीत मुलीची आई घरात काम करत असतांना पिडीत मुलगी ही घराबाहेर बसलेली होती.त्यावेळी त्यांच्या शेजारी चाळीत राहणारा आरोपी मनोज हरिहर शुक्ला पिडीतेस चॉकलेट देतो असे सांगुन तिला त्यांच्या खोलीत घेवुन गेला व तिच्यावर शारिरीक अत्याचार केला.
मुलीचे आई काम आटोपल्यानंतर बाहेर आल्यानंतर तिला तिची मुलगी दिसली नाही म्हणन तिने तिची शोधाशोध केली असता तिला तिची मुलगी आरोपीच्या घरामध्ये मिळन आली. त्यावेळी आरोपीने घरास आतुन कडी लावून घेतली होती. तर पिडीत मलीच्या ड्रेसवर रक्ताचे डाग दिसून आले.
त्यानंतर तिच्या आईने तिच्याकडे विचारपूस केली असता, मुलीने आरोपीने केलेल्या त्याबाबतची माहिती तिच्या आईला सांगीतली. त्यांनतर पिडीतेच्या आईने दिनांक १२/०५ /२०१७ रोजी आरोपी विरुध्द पारनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. सदरच्या फिर्यादीवरुन आरोपीस त्याच दिवशी अटक करण्यात आली.
सदर गुन्हयाचा पोलीस उप निरीक्षक आर.डी.पवार यांनी तपास करुन न्यायालयात आरोपी विरुष्द दोषारोपपत्र दाखल केले खटल्याची सुनावणी मा.प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, श्री.श्रीकांत एल.आनेकर यांच्या सोबत झाली खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने एकूण ५ साक्षीदार तपासण्यात आले. सदर खटल्यामध्ये पिडीत मुलीची साक्ष व न्यायवैद्यकिय अहवाल या बाबी महत्वपुर्ण ठरल्या.
मा.न्यायालया समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा ठोठावली सदर खटल्याचा निकाल न्यायालयात खटल्याचे प्रत्यक्ष काम सुरु झाल्यापासून केवळ २ महिने व ७ दिवसामध्ये लागला . त्या पैकी केवळ ६ दिवस सुनावणीचे कामकाज न्यायालयासमोर चालले होते.
शिक्षा सुनावतांना न्यायालयाने अशा घटनांचा समाजावर विपरीत परिणाम होत असतो. अशा दोषसिध्द घटणांच्या बाबतीत आरोपीस जास्तीत जास्त शिक्षा होणे आवश्यक आहे . त्यामुळे न्यायालयाने आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली. सरकारी पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी अभियोक्ता अँड अनिल सरोदे यांनी काम पाहिले.सदर खटल्याचे सुनावणी दरम्यान पैरवी अधिकारी स .लक्ष्मण काशिद यांनी सरकारी वकीलांना मदत केली.
दंडाची संपुर्ण रक्कम पिडीत तरुणीला !
आरोपी मनोज हरिहर शुक्ला, वय ३५ वर्ष रा .भरसाळ,ता.सहेजवा, गि.गोरखपुर, उत्तर प्रदेश याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या अत्याचार प्रकरणी मा. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री . श्रीकांत एल. आनेकर साहेब यांनी आरोपीस बालकाचे लैंगिक अत्याचारापासुन संरक्षण कायदा ( पोक्सा ) २०१२ चे कलम ५ ( एम ) व भादवि क. ३७६ ( २ ( आय ) , ३७७ , ३४२ , अन्वये दोषी धरुन बालकाचे लेगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा ( पोक्सो ) २०१२ चे कलम ५ ( एम ) अन्वये २० वर्षे सक्तमनुरी व १ लाख रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. दंडाची संपुर्ण रक्कम 10, 0000 रुपये पिडीत मुलीला देण्याचा आदेश न्यायालयाने केला.