अहमदनगर Live24 टीम,19 ऑक्टोबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली करण्यात आली आहे.जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची बदली झाली असून आर. बी. भोसले आता नगर जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत.
राहुल द्विवेदी यांनाही तीन वर्ष पूर्ण झाली होती. त्यामुळे त्यांचीही बदली अपेक्षित होती.आर. बी. भोसले हे यापूर्वी नगरला अतिरिक्त जिल्हाधिकारी होते. पूर्वी ते सोलापूरचे जिल्हाधिकारी होते.
तसेच नगर जिल्हा परिषदच्या रिक्त असणाऱ्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कोकण भवन येथे कार्यरत असणारे राजेंद्र क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी संगमनेर प्रांताधिकारी व नगरला उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. दरम्यान, राहुल द्विवेदी यांना कोणत्या ठिकाणी नियुक्ती दिली ते अद्याप कळू शकले नाही.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved