अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालय येथील कोविड अतिदक्षता विभागाला (ICU) शनिवारी लागलेल्या आगीमध्ये 11 रुग्ण मयत झाले असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा हा पोलिसांनी फिर्याद दिल्यावर च शनिवारी दाखल करण्यात आला आहे
गुन्ह्यांचे गांभीर्य, संवेदनशीलता व व्याप्ती पाहता सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक यांनी पोलीस उपअधीक्षक श्री संदीप मिटके , श्रीरामपूर विभाग ( अतिरिक्त कार्यभार – अहमदनगर शहर विभाग ) यांचे कडे वर्ग केला आहे.
घटनास्थळी अद्यापपावेतो केंद्रीय आरोग्य मंत्री महा राज्य आरोग्य मंत्री श्री राजेश टोपे पालकमंत्री श्री हसन मुश्रीफ महसूल मंत्री श्री बाळासाहेब थोरात जलसंपदा मंत्री श्री जयंत पाटील नगरविकास , ऊर्जा , आदिवासी विकास , आपत्ती व्यस्थापन , मदत व पुनर्वसन मंत्री श्री प्राजक्त तनपुरे मृदा व जलसंधारण मंत्री श्री शंकरराव गडाख विभागीय आयुक्त नाशिक श्री राधाकृष्ण गमे पोलीस उपमहानिरीक्षक श्री बी जी शेखर
अहमदनगर जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले पोलीस अधीक्षक श्री मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक श्री सौरभ अगरवाल खासदार श्री सुजय विखे , श्री सदाशिव लोखंडे आमदार निलम गोऱ्हे , श्री संग्राम जगताप , श्री सत्यजित तांबे , श्री लहू कानडे , श्री रोहित पवार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ पोखरणा जिल्हा परिषद अध्यक्षा सौ राजश्रीताई घुले , महावितरण सचिव व कमिटी विभागीय आयुक्त कमिटी आदींनी भेटी दिल्या आहेत.
पुढील तपास पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली Dy S P संदीप मिटके हे करीत आहेत.