अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्याला हादरवणार्या हत्याकांडचा अखेर पर्दाफाश !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2020 :- श्रीगोंदा तालुक्यातील चार जणांच्या हत्याकांडाने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र हे हत्याकांड खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष व त्यानंतर झालेल्या वादातून घडले असल्याची माहिती आता समोर आली आहे.

खोदकाम करताना मिळालेले सोने स्वस्तात देण्याचे आमिष दाखवून जळगावातील पाच जणांना अहमदनगर येथील तरुणाने बोलावून घेतले. सोने न देता या चार जणांनी जळगावातील पाच जणांचे पैसे लुटण्याचा प्रयत्न केला.

यावेळी झालेल्या वादातून सोने घेण्यासाठी गेलेल्या जळगावातील पाच जणांनी चोकूने भोसकून नगरमधील चौघांची हत्या केली. श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथे हे हत्याकांड घडले.

जळगावातील पाच जणांना अहमदनगर येथील तरुणाने बोलावून घेतले. नरेश उर्फ बाळा जगदीश सोनवणे (वय २२), प्रेमराज रमेश पाटील (२२), योगेश मोहन ठाकुर (२२), कल्पना किशाेर सपकाळे (४०) व आशाबाई जगदीश सोनवणे (४२, सर्व रा.हरी विठ्ठलनगर) या सर्वांनी तीन लाख रुपये गोळा केले. खासगी वाहनाने श्रीगोंदा तालुक्यात दाखल झाले

मात्र घटनास्थळावर दबा धरून बसलेले चव्हाण बंधू व इतर दोघांनी पैशांची बॅग हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे तेथे दोन गटांत हाणामारी सुरू झाली.

यातूनच जळगावातून गेलेल्या पाचही जणांनी चाकूने वार करीत नातीक कुंजीलाल चव्हाण (वय ४०),श्रीधर कुंजीलाल चव्हाण (३५), नागेश कुंजीलाल चव्हाण (सर्व ४०, रा.सुरेगाव, ता. श्रीगोंदा) व लिंब्या हाबऱ्या काळे (वय २२, रा.देऊनगाव सिद्धी, ता.अहमदनगर) या चौघांचा खून केला.

यानंतर संशयित जळगावात पळून आले होते. हाणामारीत एक जणाचे एटीएम कार्ड घटनास्थळी पडले होते. एटीएम कार्ड मिळाल्यानंतर तांत्रिक माहिती घेतली असता हे कार्ड जळगावातील असल्याचे समोर आले.या प्रकरणी पाच संशयितांना नुकतीच अटक करण्यात आली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24