अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना शहर परिसरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
तसेच वारंवार घडणार्या या घटनांमुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीचा आलेख दरदिवशी वाढतच चालला आहे. दरम्यान या घटनेत रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक ता. नगर) यांचा मृत्यू झाला आहे.
मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ठ झालेले नाही. हे हत्याकांड कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ घडले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, रामदास पंडित हे केडगाव येथे ड्रायव्हर म्हणून काम करतात अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
बुधवारी रात्री त्यांनी केडगाव येथून घरी येत असल्याची माहिती फोन करून घरच्यांना दिली होती. यानंतर रामदास घरी आले नाही व त्यांचा फोन बंद येत होता. त्यांच्या घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. आज सकाळी रामदास यांचा मृतदेह कल्याण बायपास जवळील लामखडे पेट्रोल पंपाजवळ मिळून आला.
त्यांच्या गळ्यावर हत्याराने वार केलेले होते. गळा चिरून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. रामदास यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आला आहे.
दरम्यान घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपअधीक्षक (नगर ग्रामीण) अजित पाटील यांच्यासह एमआयडीसी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved