अहमदनगर ब्रेकिंग : पाण्यात बुडणाऱ्या पुतणीला वाचविताना इंजिनियरचा पाण्यात बुडून मृत्यु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथे पाण्यात बुडणाऱ्या पुतणीला वाचविताना इंजिनियर राजू मुरलीधर घोडके यांचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. यात पुतणी संस्कृती घोडके (वय ७). हीला डॉ. भांडकोळी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिच्यावर योग्यवेळी उपचार केल्याने ती बचावली. मात्र, राजू घोडके यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.

आज रोजी सायंकाळी ते पुतणी व एका मुलास घेऊन प्रवरा नदिवर आले होते. त्यांची सहा वर्षीची पुतणी नदीकाठी माशांना पाहत होती. या दरम्यान तीचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली.

हे पाहताच राजू यांनी तिला हात देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती खाली वाहु लागली. डोळ्यासमोर लेकरु गटांगळ्या खात असल्याचे पाहुन त्यांनी पाण्यात उडी मारली. परंतु, त्यांना पोहता येत नसल्यामुळे ते देखील बुडू लागले.

मात्र, त्यांनी मुलीस नदिच्या काठाकडे ढकलण्याचा प्रयत्न केला. ती काठाकडे आली. मात्र, राजू यांना नदिच्या खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांच्या नाकातोंडात पाणी गेले. हा सर्व प्रकार त्यांच्यासोबत आलेल्या लहान मुलाने पाहिला असता तो गावाकडे पळत सुटला.

ओरडून ओरडून त्याने गावातील काही लोक जमविले. त्यांनी नदीत उडी मारुन दोघांना बाहेर काढले. यावेळी राजू हे पुर्वीच पाण्यावर तरंगत होते तर मुलीच्या पोत पाणी गेल्याने ती बेशुद्ध झाली होती.

दोघांना अकोल्यातील भांडकोळी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, राजू यांनी तेथेच प्राण सोडला होता. मात्र, मुलगी वाचविण्यात डॉक्टरांना यश आले.अकोले तालुक्यातील ही याच महिन्यातील तिसरी घटना आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24