अहमदनगर ब्रेकिंग : मामा भाच्याच्या वाद; मामाने पिले किटकनाशक तर भाच्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 / श्रीरामपूर :- तालूक्यातील टाकळीभान येथे मामा भाच्याच्यात झालेल्या वादातून मामाने विषारी किटकनाशक पिल्याने घाबरलेल्या भाच्याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली.

या विषयी माहिती अशी की, टाकळीभान येथील नवनाथ वेणूनाथ खंडागळे (वय ३० वर्ष) व त्यांचा भाचा मनोज चव्हाण (वय २२ वर्ष) हे त्यांच्या शेतात वस्ती करून राहतात. खंडागळे यांनी त्यांच्या बहिनीला काही जमिन दिलेली आहे.

त्यामुळे मामा भाचे शेती करतात. सोमवारी ५ वाजेच्या दरम्यान मामा भाच्यात वाद झाला. त्यामुळे मामा नवनाथ खंडागळे यांनी विषारी किटकनाशक पिले.

मामाने किटकनाशक पिल्याचे पाहून घाबरलेल्या भाच्याने मनोज चव्हाण याने जवळच असलेल्या विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

ही माहिती मिळताच ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे यांनी घटनास्थळी जावून तातडीने नवनाथ खंडागळे यांना उपचारासाठी श्रीरामपूर येथे हाॅस्पिटलमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती सुधारत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24