अहमदनगर Live24 ,15 मे 2020 :- मिरजगाव नजीकच्या बावडकरपट्टी येथे विजेचा धक्का बसून शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सुनील सहादू बावडकर ( वय : ४२) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
आज सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडली. शेतातील बोअरवेल चालू होत नसल्यामुळे बावडकर हे केबल कुठे खराब झाली आहे का ? याची पाहणी करत होते.
त्यावेळी विजेचा धक्का बसून ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने खासगी रुग्णवाहिकेतून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे.
युवराज लक्ष्मण बावडकर यांच्या खबरीवरून कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव गर्जे करीत आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com