अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ पळून गेलेल्या अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :- सिव्हिलमध्ये कोरंटाईन होण्याऐवजी डॉक्टरांना दमदाटी व शिवीगाळ करून उत्पादन शुल्कच्या दुय्यम निरीक्षक पसार झाला होता. त्याच्याविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याप्रकरणी डॉ. श्रीकांत चंद्रकांत पाठक यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी येथील राज्य उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ते अधिकारी पुणे येथे जाऊन आल्याने 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आले होते. यावेळी डॉ. पाठक यांनी त्यांचे स्राव नमुने घेतले.

त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये कोरंटाईन होण्यास सांगितले. त्यांनी डॉ. पाठक व हॉस्पिटलमधील इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व दमदाटी करून तेथून ते बेजबाबदारपणे निघून गेले.

त्यांनी सार्वजनिक आरोग्याला धोका होईल, असे कृत्य केले असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24