ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : ८० कोटींचा आर्थिक घोटाळा तब्बल २१ जणांविरुद्ध गुन्हा

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ८० कोटींचा आर्थिक घोटाळा नुकताच उघड झाला असून याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

यातील चार जणांना पोलिसांनी काल शनिवारी अटक केली असून त्यांना न्यायालयाने पुढील सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली.

२१ पैकी लहानु गणपत कुटे, उल्हास रावसाहेब थोरात, सोमनाथ कारभारी सातपुते व अमोल क्षीरसागर या चार जणांना अटक करण्यात आली आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष, त्यांचे कुटुंबीय, व्यवस्थापक व इतर आरोपी फरार झाले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींना काल शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायालयाने आरोपींना ६ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत जिल्हा विशेष लेखा परीक्षक राजेंद्र निकम यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. असून त्यावरून पोलिसांनी दूधगंगा पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब दामोदर कुटे (रा. गणपती मळा, सुकेवाडी), व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ (रा. संगमनेर),

अकाउंटंट भाऊसाहेब संतु गायकवाड (रा. घुलेवाडी) (मयत), चेतन नागराज बाबा कपाटे (रा. पैठणरोड, संभाजीनगर), दादासाहेब भाऊसाहेब कुटे, संदिप भाऊसाहेब कुटे, अमोल भाऊसाहेब कुटे, विमल भाऊसाहेब कुटे, शकुंतला भाऊसाहेब कुटे,

सोनाली दादासाहेब कुटे (सर्व रा. गणपती मळा सुकेवाडी, ता. संगमनेर), कृष्णराव श्रीपतराव कदम (रा. देवळाली प्रवरा, राहुरी), प्रमिला कृष्णराव कदम, अजित कृष्णराव कदम, सुजित कृष्णराव कदम (सर्व रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी),

संदिप दगडु जरे (रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर), लहानु गणपत कुटे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), उत्तम शंकर लांडगे (रा. वडगाव लांडगा ), संगमनेर, उल्हास रावसाहेब थोरात (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर), सोमनाथ कारभारी सातपुते (रा. पावबाकी, संगमनेर),

अरुण के. बुरड (रा. नयनतारा, सिडको, कॉलनी नाशिक), अमोल क्षीरसागर ( रा. अरिहंत हॉस्पीटल जवळ आकाशवाणी केंद्र रोड, गंगापूर, नाशिक) या २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे करीत आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office