अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अहमदनगर जिल्ह्यात सध्या कोरोनामुळे लॉकडाऊन असला तरी जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होताना दिसत नाहीय श्रीरामपूर तालुक्यात पूर्ववैमनस्यातून दोन गटात वादावादी तसेच हाणामारी होवून गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आलीय
खैरीनिमगाव (ता. श्रीरामपूर) येथे काल रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.या गोळीबारात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लोणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलेय.
शहरातील पंजाबी कॉलनीत राहणाऱ्या हॅपी उर्फ अमरप्रितसिंग सरबतसिंग सेठी याच्या मालकीचा खैरीनिमगाव येथे फार्म हाऊस आहे. हॅपी, त्याचा मित्र कृष्णा सतिष दायमा व हरजितसिंग चरणसिंग चुग हे तिघे तेथे गेले होते.
हॅपी सेठी याचे पूर्वीपासून गोंधवणी येथील सागर विजय धुमाळ, अंकुश रमेश जेधे व नमोद अरुण कांबळे, महेश बोरुडे यांच्याशी वाद आहेत. हे देखील सेठी याच्या फार्म हाऊसवर गेले. तेथे त्यांच्याच वाद झाले. यावेळी हाणामारी व चाकू हल्ला झाला.
आरोपी सागर धुमाळ याने दोन लाख रुपयांची मागणी केली. ती दिली नाही म्हणून गावठी कट्ट्यातून गोळीबार करण्यात आला. मात्र सावधगिरी बाळगल्याने गोळी लागली नाही, असे सेठी याने फिर्यादीत म्हटले आहे.
सागर धुमाळ याने दुसरी फिर्याद दिली असून मागील भांडणाच्या वादातून हॅपी सेठी याने चाकूने व लाकडी दांड्याने मारहाण करुन जखमी केल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून पोलिसांनी दोन्ही गुन्हे नोंदविले आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com