अहमदनगर Live24 टीम, 17 डिसेंबर 2020 :- पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भागाजी रभाजी खरमाळे यांचे पुणे येथे उपचार घेत असताना निधन झाले.
गेल्या एक महिन्यापासून कोरोनाची लागण झाल्याने नगर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातून ते बरेही झाले होते परंतु त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने पुणे येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
परंतु त्यातच त्यांचे निधन झाले. मृत्यसमयी ते ६७ वर्षांचे होते. काळकूप गावचे सरपंचपद तसेच सोसायटीचे चेअरमन म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते तर त्यांच्या लहान भावजय सध्या सरपंचपदाचा कार्यभार सांभाळत आहेत.
भागा मिस्तरी म्हणून ते परिसरात सर्वपरिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.