अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरण प्रकरणाने आज मोठे वळण घेतले. दत्तात्रय कोते यांच्या अपहरणामागील सूत्रधार शिर्डीचे माजी उपनगराध्यक्ष विजय तुळशीराम कोते हेच असल्याचे पुढे आले आहे.
पोलिसांनी विजय कोते यांना आज अटक केलीय. शिर्डी नगरपंचायतीचे मनसेचे नगरसेवक दत्तात्रय कोते यांचे नगर- औरंगाबाद रस्त्यावर एका हॉटेलजवळ रात्रीच्यावेळी अपहरण करण्यात आले होते.
या अपहरणानंतर दत्तात्रय कोते यांना संरक्षण देण्यात आले होते. त्यानंतर पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, नगरसेवक दत्तात्रय कोते यांच्या अपहरणापमागील मोठा सुत्रधार पकडा, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली होती.
दरम्यान, पोलिसांनी पकडलेले आरोपी, घटना घडलेले ठिकाण आणि मोबाईल नंबरचे धागेदोरे शोधत पोलिसांनी यांच्या अपहरणप्रकरणी सूत्रधार म्हणून विजय तुळशीराम कोते यांना आज अटक केली.
कोते हे प्रतिष्ठीत राजकारणी आणि उद्योजक म्हणून ओळखले जातात. मात्र आता त्यांना थेट अपहरण प्रकरणात अटक झाल्याने शिर्डी परिसरात उलटसुलट चर्चा सुरु आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com