अहमदनगर ब्रेकिंग : माजी पं. स. सदस्याच्या जुगारअड्ड्यावर छापा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्यातील भानगाव शिवारातील बंगल्यात चालू असलेल्या माजी पं. स. सदस्याच्या जुगारअड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. पोलिसांना पाहताच अड्डा चालवणारा सुरेश पंढरीनाथ गोरे पळून गेला.

पाच जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले. १२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या बंगल्यात लाखो रुपयांची उलाढाल होणारा हार-जितीचा जुगार खेळला जात

असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या पथकाने तेथे छापा टाकला.

पोलिसांना पाहताच माजी पंचायत समिती सदस्य सुरेश गोरे पळून गेला. इतर पाच जुगाऱ्यांना पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यामध्ये नाना बाबुराव गायकवाड (काष्टी), राजेंद्र मारुती ससे (सावेडी, नगर),

भारत शिवाजी सोनटक्के (चैतन्यनगर, बीड), संतोष ज्ञानदेव तोरडमल (भानगाव), सचिन मच्छिंद्र तोरडमल (भानगाव) यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून १२ हजार रुपयांची रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.

कॉन्स्टेबल संजय काळे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदे पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप करत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24