अहमदनगर ब्रेकिंग : मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या चौघा नराधमांना अटक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,13 जुलै 2020 :- नेवासा खुर्द परिसरात एका मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्याचा प्रकार उघड झाला आहे. 

सदर तरुणी गर्भवती राहिल्याने हा भयंकर प्रकार समोर आला आहे.दरम्यान, नेवासा पोलिसांनी पाच आरोपींपैकी चोघा आरोपींना अटक केली आहे. हे सर्व आरोपी नेवासा परिसरात राहणारे आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नेवासा खुर्द परिसरात एका कुटुंबातील २४ वर्षे वयाच्या मनोरुग्ण तरुणीला नेवासा बुद्रुक शहरातील स्मशानभूमीजवळील उसाच्या शेतात नेऊन आरोपींनी तिच्यावर वेळोवेळी सामुहिक बलात्कार केला.

सदर तरुणी मनोरुग्ण असल्याचा फायदा घेवून तिच्यावर हा अत्याचार करण्यात आला. एप्रिल २०२० पासून ते ८ जुलै २०२० दरम्यान, वेळोवेळी पिडीत तरुणीवर बळजबरीने संभोग करत बलात्कार करण्यात आला. त्यातून सदर तरुणी गर्भवती झाली आहे.

या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने नेवासा पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी महेश उर्फ बाळू अशोक गोजारी, [रा. नेवासा,] संदीप झुंबर जरे, रा. नेवासा, रामेश्वर गुलाब सोनटक्के, [रा. नेवासा], भारत चिमाजी इरले, [रा. गंगानगर, नेवासा खुर्द, ता. नेवासा], कैलास गंगाधर जाधव, [रा. नेवासा ब्‌., ता. नेवासा] यांच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल काण्यात आला.

घटनास्थळी डिवायएसपी जवळे, पो. नि. रणजित डेरे यांनी भेट दिली. या घटनेचा तपास तपास पो. नि. डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. आरोपी पहेश उर्फ गोजारी, संदीप जरे, रामेश्वर सोनटक्के, भारत इरले या चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर कैलास जाधव या फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24