अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातून चार खुणाच्या गुन्ह्यातील जेल तोडून पसार झाले आहेत. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना रात्री साडेसातच्या सुमारास घडली असून या घटनेमुळे पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे. दरम्यान फरार आरोपींचा पोलीस तपास करत आहेत.
कर्जत पोलीस स्टेशनच्या जेलमधील कस्टडी क्रमांक तीन येथे असलेले चार खुणी आरोपी अक्षय रामदास राऊत, चंद्रकांत महादेव राऊत, दोघे राहणार जामखेड ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, जवळा जामखेड गंगाधर लक्ष्मण जगताप राहणार महाळंगी तालुका कर्जत.
हे जेलच्या छतावरील प्लाऊड कटरच्या सहाय्याने कट करुन त्यानंतर कौल काढले आणि या चारही आरोपींनी पलायन केले. यामधील ज्ञानेश्वर कोल्हे जामखेड तालुक्यातील असून ह्या रिवाल्वर आणि त्याची विक्री करणे यासह अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे
तर अक्षय रामदास राऊत व चंद्रकांत महादेव राऊत हे जामखेड येथील दोन्ही आरोपी मुंबईतील टरबूज व्यापाऱ्याच्या खुनाच्या गुन्ह्यामध्ये अटकेत होते. तर गंगाधर जगताप कर्जत तालुक्यातील आरोपी बलात्काराच्या खुण्याच्या गुन्ह्यांमध्ये होता.
हे सर्व आरोपी एकाच कस्टडीमध्ये ठेवले होते. हे चारही आरोपी खतरनाक असताना त्यांना कर्जत येथील जेलमध्ये का ठेवण्यात आले. हा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो.