अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव तालुक्यातील धारणगाव ग्रामपंचायत हद्दी जवळ कोळपेवाडी कडून कोपरगावकडे भरधाव वेगात येणार्या होंडा सिटी कारच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार लिंबाच्या झाडावर धडकून झालेल्या अपघातात कारचा चक्काचुर होऊन कारने अचानक पेट घेतल्याने 4 जनांचा मृत्यू झाला.
ही घटना मंगळवार (दि 28) रोजी रात्री आकरा वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे कोपरगाव तालुक्यातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे. सदरचे सविस्तर वृत्त असे कि, रवींद्र वानले यांनी नुकतीच होंडा सिटी कार (एम.एच.15 बी.एक्स.5145) क्रमांकाची कार नोटरी करून विकत घेतली होती.
ती अद्याप नावावर करण्याचे काम बाकी असताना ते आपली कार घेऊन काही कारणाने नाशिकवरून कोळपेवाडी मार्गे रात्री अकरा वाजेच्या सुमारास कोपरगावकडे भरधाव वेगाने येत असताना त्यांचा कारवरील नियंत्रण सुटले व कार तितक्याच वेगाने रस्त्याच्या कडेला झाडावर आदळली
त्यातून या कारने पेट घेतला व त्यात चालक रवींद्र वानले (वय 32), पत्नी प्रतिभा रवींद्र वानले (वय 23), मुलगा साई रवींद्र वानले (वय 10), मुलगी जानव्ही रवींद्र वानले (वय 4) सर्व राहणार मोहाडी ता.दिंडोरी, हल्ली मुक्काम नाशिक यांचा मृत्यू झाला आहे.