अहमदनगर ब्रेकिंग : चारचाकी वाहनाचा टायर फुटून अपघात, सहा जण जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

संगमनेर :– तालुक्यातील ग्रामीण भागात गरजुंना जेवणाची पाकिटे घेऊन जाणाºया चारचाकी वाहनाचे टायर फुटून अपघात झाला. यात सहा जण जखमी झाले आहेत.

रविवारी दुपारी दोनच्या सुमारास हा अपघात कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान घडला.

बलज्योतसिंग कुणालसिंग पंजाबी (वय ३०), नरेंद्रसिंग जयसिंग पंजाबी (वय ४०) सागर जयमोहन जनवेजा (वय ३८), इंद्रजीतसिंग सुभाष बत्रा (वय ३६), शिवकुमार मनोजकुमार कालडा (वय २७) सौरभ अरविंद पापडेजा (वय २८) अशी या अपघातातील जखमींची नावे आहेत.

गेल्या काही दिवसांपासून संगमनेरातील पंजाबी बांधवांच्यावतीने बसस्थानकासमोरील गुरूद्वारा येथे गरजुंसाठी जेवण बनविण्यात येते. त्यानंतर जेवणाची पाकिटे बनवून ती ग्रामीण भागातील गरजुंना पोहोच केली जातात.

तालुक्यातील कौठे कमळेश्वर व निळवंडे परिसरातील गरजुंना जेवणाची पाकिटे देण्यासाठी सहा जण हे चारचाकी वाहनातून निघाले होते.

कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गणपती मंदिर ते कोल्हेवाडी चौफुली दरम्यान या वाहनाचे मागील दोन्ही टायर फुटुन अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता त्यात वाहनाचे मोठे नुकसान झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24