अहमदनगर ब्रेकिंग : भीषण अपघातात चार तरुण ठार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2020 :- ट्रक व मोटारसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात लोणीव्यंकनाथ येथील चार तरुण जागीच ठार झाले.

नगर-दौड रोडवर पवारवाडीजवळ बुधवारी (दि.९) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विशाल संतोष सोनवणे,राहुल बाजीराव बरकडे,राजकुमार विठ्ठल पवार,प्रतीक नरसिंग शिंदे या चार तरुणांचा आज सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान दौंड नगर रस्त्यावरील पवारवाडी फाट्यानजीक झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी अनिल शिंदे यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक तात्यासाहेब संपत पवार (रा बेलवंडी खुर्द,ता.पाटण,जि. सातारा) याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

हे चारही तरुण दहावी,अकरावी इयत्तेत शिकणारे पंधरा ते वीस वर्षे वयोगटातील असून ते घरच्यांना एकलुते एक असल्याची माहिती समजली आहे.या घटनेमुळे लोणीव्यंकनाथ गावावर शोककळा पसरली आहे

आज सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या दरम्यान हे तरुण दुचाकीवरून जात असताना दौंड नगर रस्त्यावर पवारवाडी फाट्यानजीक ट्रॅकटरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी समोरून ट्रक आला त्या ट्रकची तरुणाच्या दुचाकीला जोराची धडक बसली त्या अपघातात या चारही तरुणांना आपला जीव गमवावा लागला.

ट्रक चालकाला ताब्यात घेतले आहे मयत चारही मुलं हे एकमेकांचे जिवलग मित्र होते या जिवलग मित्रांचा असा करून आंत झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत

अहमदनगर लाईव्ह 24