ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : २ कृषी केंद्र चालकावर फसवणुकीचा गुन्हा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2021 :- कर्जत तालुक्यातील गुरवपिंपरी येथील शेतकरी प्रकाश गावडे व विनोद गावडे यांनी दिलेल्या बायोसूल या किटकनाशकाच्या फवारणीने झालेल्या नुकसानीच्या तक्रारीनुसार तपास होऊन बोगस कंपनी उघडकीस आल्याने दोघांवर खते औषधे नियंत्रण कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा तालुका कृषी अधिकाऱ्यांनी केला.

संबंधित बायोसूल नावाचे बनावट औषध पुरवणारे आणि विकणारे नंदराज अहिरे, यश अॅग्रो कन्सल्टन्सी, मिरजगाव तसेच हे औषध त्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देणारे लक्ष्मीकांत हुमे (दोघेही रा. मिरजगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या दोघांनी विकलेल्या बायोसुल या बनावट औषधाच्या डाळिंब पिकावरील फवारणीमुळे फळांची मोठ्या प्रमाणात गळ झाल्याची तक्रार कृषी विभागाकडे करण्यात आली होती.

शेतकऱ्याचे यामुळे २५ ते ३० लाख रुपये नुकसान झाल्याचे म्हणने आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक अमरजित मोरे हे करत आहेत.

Ahmednagarlive24 Office