अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जामखेड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीस गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व दाखल झालेला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 30 हजारांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक सज्जन किसन नार्हेडा (वय-26) व तुकाराम रामराव ढोले यांना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले.
जामखेड येथील हॉटेल कृष्णा येथे नगरच्या लाचलुचपत विभागाने केली. तक्रारदार यांच्या भावास जामखेड येथे एका गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यास पोलीस कास्टडी रिमांड घेतली आहे.
गुन्ह्याचे तपासात मदत करण्यासाठी व तक्रारदार यांचे भावास 169 प्रमाणे गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडी अंती तक्रारदार यांचेकडे 50 हजार रुपये देण्याचे ठरले.
तसेच ही रक्कम ढोले याच्याकडे हॉटेल कृष्णा येथे देण्यास सांगितले. त्याप्रमाणे आज (दि.5) रोजी लाचलुलपत विभाने सापळा लावला.
यावेळी तक्रारदार ढोले यास 30 हजार रुपये देत असता त्यास ताब्यात घेतले.या प्रकरणी नार्हेडा व ढोलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.