अहमदनगर ब्रेकिंग : क्वारंटाइन होण्यास सांगितल्याच्या रागातून ‘त्याने’ घेतले विष !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 मे 2020 :- कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून मास्क न लावता फिरणाऱ्यास क्वारंटाइन होऊन गावातील विलगीकरण कक्षात रहा या कारणावरून संबंधित व्यक्तीने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

खळबळजनक घटना काल १२ . ३० वा . कोपरगाव तालुक्यातील मढी गावच्या शिवारात मोकळ वस्ती भागातील अजय भाऊसाहेब मोकळ याच्या घरात घडली.

अजय मोकळ याच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत याप्रकरणी मढी बु गावच्या सरपंच संगिता बापूसाहेब गवळी यांनी कोपरगाव तालुका पोलिसात फिर्याद दिल्यावरुन आरोपी अजय भाऊसाहेब मोकळ , रा . मढी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरपंच महिला संगिता गवळी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की , आरोपी अजय मोकळ हा अकोला जिल्हा येथून बाहेर वावरुन मढी बु . येथे येवून सदरबाबत कोणाला काहीएक माहिती न देता विनापरवानगीने गावात येवून मास्क न लावता विनाकारण गावात फिरत होता

त्याच्या अशा कृत्यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होवू शकतो हे त्याला माहित असताना त्याने असे कृत्य करुन जिल्हाधिकारी नगर यांच्या आदेशान्वये क्वॉरंटाईन होवून गावातील विलगीकरण कक्षात राहण्याबाबत सांगितले असता त्याने तेथे राहण्यास नकार दिला,

तो त्याचे गावातील नवीन घरातच राहणेबाबत हट्टाहास धरल्याने त्यास फिर्यादी यांनी समजावून सांगितले की , तुला जर तुझ्या नवीन घरात राहण्यास परवानगी दिली तर गावातील दुसरे लोकही तसेच करतील त्यामुळे आम्हाला विलगीकरण कक्षातच रहावे लागेल ,

असे सुचित केले असता त्याचा राग येवून आरोपीने त्याचे घरात जावून कोणतेतरी विषारी औषध पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला .

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24