ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकींग: तो तिच्या प्रेमात वेडा झाला अन् तिने घेतले पेटून; उपचारादरम्यान मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28  डिसेंबर 2021 :- युवकाच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने पेटवून घेतल्याची खळबळजनक घटना नगर तालुक्यातील गुंडेगावमध्ये घडली. विवाहिता जास्त भाजल्याने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे.(Ahmednagar Breaking)

शितल स्वामी चव्हाण (वय 26 रा. घोसपुरी ता. नगर) असे मयत विवाहितेचे नाव आहे. जखमी शितलवर पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तिने नगर तालुका पोलिसांना दिलेल्या जबाबावरून तिला त्रास देणारा युवक अभिमन्यू शिवराम भोसले (वय अंदाजे 23 रा. देऊळगाव सिध्दी ता. नगर) याच्याविरोधात नगर तालुका पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शितल ही मूळची गुंडेगाव येथील असून घोसपुरी हे तिचे सासर आहे. घटना घडली त्यावेळी शितल माहेरी वडिलाकडे आलेली होती. अभिमन्यू हा शितलला म्हणाला, तु मला आवडतेस व मी तुला पसंत करतो. तु तुझ्या नवऱ्याला सोड चिठ्ठी दे, नाही दिली तर मी तुला पळवुन घेवुन जाईन, अशी धमकी दिली.

शितल ने अभिमन्यूला समजावून सांगितले; पण अभिमन्यू तिच्या प्रेमात वेडा झाला होता, तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अभिमन्यूचा त्रास असाह्य झाल्यानं शितल ने पेटून घेतले. यामध्ये शितल जास्त भाजली होती.

तिला उपचारासाठी पुणे येथील ससुन हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. नगर तालुका पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी ससुन हॉस्पिटल गाठले. शितलचा जबाब नोंदविला. यावेळी सर्व घटनाक्रम समोर आला. दरम्यान उपचारादरम्यान शितलचा मृत्यू झाला.

पोलिसांनी अभिमन्यू भोसले विरोधात गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे. पोलिसांचे एक पथक त्याला पकडण्यासाठी गेले असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office