अहमदनगर ब्रेकिंग : सहाव्या मजल्यावरून उडी घेत मुख्याध्यापकाची आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,3 सप्टेंबर 2020 :- जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक शरद गोरक्षनाथ तांबे (४६) यांनी कुंकुलोळ संकुलाच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. 

ही घटना बुधवारी दुपारी बारा वाजता घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. तांबे यांच्यामागे आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.

इमारतीखालीच तांबे यांचे कपड्याचे दुकान आहे. निबे देवकर वस्तीनजीक दातीर वस्तीवरील जिल्हा परिषद शाळेत ते कार्यरत होते.

तांबे यांच्याजवळ चिठ्ठी मिळाली नसल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले. पुढील तपास उपनिरीक्षक नानासाहेब सूर्यवंशी करत आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24