अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2020 :- पारनेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अळकुटी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साहेबराव नाना गोरडे वय 52 यांचे मंगळवारी सकाळी 11. 30 वाजण्याच्या सुमारास अळकुटी शिवारात अपघाती निधन झाले.
प्रभारी मुख्याध्यापकाचा पदभार असल्यामुळे गोरडे हे त्यांचे गाव लोणीमावळा येथून अळकुटी येथे शाळेत गेले होते. तेथील कामकाज आटोपून ते पुन्हा लोणीमावळयाकडे दुचाकीवरून निघाले असता
लोणीमावळा रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोबाईलवर फोन आला. दुचाकी थांबवून ते फोनवर बोलत असताना अळकुटीवरून लोणीमवळयाकडे येणा-या इंडीका कारने त्यांना मागून जोराची धकड दिली.
त्यात ते गंभीर जखमी झाले. गोरडे यांना घटनास्थळावरून अळकुटीच्या स्थानिक डॉक्टरांकडे नेण्यात आले. परंतू ते जागीच मृत पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गोरडे हे शिक्षकांच्या गुरूकुल मंडळाचे कार्यकर्ते होते. शिक्षकांसह स्थानिक राजकारणात रस असलेले गोरडे गुरूजी अतिशय मनविळावू व्यक्तीमत्व होते. त्यांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved