अहमदनगर ब्रेकिंग : ‘हे’ वाईन शॉप केले सील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,12 मे 2020 :- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची पायमल्ली केल्याने आज दुपारी श्रीगोंदा शहरातील सत्यम वाईन शॉप सील करण्यात आले.

श्रीगोंदा तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथकाने सत्यम वाईन शॉपसमोर ही कारवाई करण्यात आली.

आज दुपारी श्रीगोंदा शहरातील सत्यम वाईनसमोर मोठी रांग लागली होती. सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नव्हते.

मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांची नोंद नव्हती. थर्मल स्कॅनर नव्हते.

शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी आम्हाला त्रास होतो, अशा तक्रारी केल्या होत्या.

याबरोबरच काही इलेक्ट्रॉनिक मोबाईल शॉपी बंद करण्यात आल्या.

या पथकात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ . नितीन खामकर , नगरपालिकेचे वरिष्ठ लिपिक दिलीप मोटे आदी सहभागी झाले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24