अहमदनगर ब्रेकिंग : घरावर छापा टाकत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,28 मे 2020 :- श्रीगोंदा पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाया एका घरावर छापा टाकत ३ महिला, ३ पुरुष तसेच व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.

श्रीगोंदे शहरातील श्रीगोंदे नगरपरिषदेच्या कार्यालयाच्या मागिल बाजूस चालू असलेल्या वेश्या व्यवसायावर श्रीगोंदे पोलिसांनी बुधवारी  छापा टाकला व आरोपीवर श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव व पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना श्रीगोंदे शहरात एका ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली.त्यांनी त्याठिकाणी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली.

पोलिस निरीक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनखाली दुपारी एकच्या दरम्यान सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस हवालदार रोहिदास झुंजार, अमोल आजबे, खारतोडे, महिला पोलिस कर्मचारी लता पुराणे, छाया माने यांच्या पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला.

तेथे यामध्ये अकबर हमजुखान बागवान (श्रीगोंदे), छोटूभाई शेख (घोसपुरी), संजय कचरू जाधव (आढळगाव) हे तिघे तीन महिलांबरोबर अश्लील चाळे करताना आढळून आले.

पोलिस पथकाने त्या तिघासह मालकाला ताब्यात घेतले असून त्यांच्याविरोधात श्रीगोंदे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24