अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :- पाथर्डी तालुक्यातील कळसपिंपी येथील पती-पत्नीचा मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला आहे.
अपघातानंतर त्यांना अहमदनगर येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. उपचारादरम्यान दोघेही मयत झाले.
कोरडगाव पागोरी पिंपळगाव रस्त्यावर भरधाव वेगाने येणा-या हुंडाई क्रिटा या चार चाकीच्या धडकेत दुचाकीवरस्वार असलेले पती पत्नी रा.कळसपिंप्री यांचा मृत्यू झाला आहे.