अहमदनगर ब्रेकिंग : पत्नी नांदायला येत नसल्याने पतीने केली आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :-  राहाता तालुक्यातील को-हाळे येथील अनिल काशिनाथ खरात (वय २३) याने याची पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरून छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.

दि. १२ जुलै रोजी दोन वाजण्यापूर्वी ही घटना घडली. पत्नी माहेरी निघून गेली असून ती नांदायला येत नसल्याच्या कारणातून त्याला नैराश्य आले होते. या कारणातून त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल नरोडे हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24