अहमदनगर Live24 ,12 जून 2020 : चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच पत्नीचा खून केला. ही घटना कर्जत तालुक्यातील चखालेवाडी येथे घडली.याबाबत मयत विवाहितेच्या पित्याने कर्जत पोलिसांत पतीविरूध्द तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर असे की, कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील बलभीम शंकर मिंड यांची मुलगी आरती हिचा विवाह चखालेवाडी येथील सुरेश सिद्धू खटके याच्याबरोबर झाला होता.
शुक्रवार दि.१२जून रोजी दुपारी ३-१९ च्या सुमारास सुरेश खटके याने बलभीम शंकर मिंड यांना फोन करून आरती विहिरीत पडून मयत झाली असल्याची माहिती दिली.
बलभीम मिंड हे त्वरित आपला मुलगा शिवाजी व पत्नी भामाबाई यांना घेऊन चखालेवाडी येथे आले असता, तेथे घराच्या दारासमोर आरती हिचा मृतदेह ठेवल्याचे आढळून आले,
यावेळी तिचे वडील यांनी आरतीचा मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे आणला व याबाबतची खबर रात्री कर्जत पोलिस स्टेशनला दिली.
यानंतर आज दुपारी मिंड यांच्या फिर्यादीवरून सुरेश खटके याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फिर्यादीत म्हटले आहे की, जावई सुरेश खटके यांनी चारित्र्याचा संशय घेऊन आरतीस शेतातील विहिरीच्या पाण्यात बुडवून मारले.
याबाबत कर्जत पोलिस तपास करत आहेत. घटनास्थळास उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांनी भेट दिली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews