अहमदनगर लाईव्ह24 टीम :- अकोले तालुक्यातील चैतन्यपूर येथे पतीनेच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. पत्नीच्या मृत्यूनंतर सासरच्या लोकांनी बनाव तयार करून मृत विवाहिता ही गोठ्यात गाईचे दूध काढण्यासाठी गेली असता गाईने लाथ मारल्यानंतर ती दगडावर जाऊन आदळली व त्यातच तीचा मृत्यू झाल्याचा बनाव केला.
सविता भगवान हुलवळे असे मृत विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेचे वडील पूंजा आवारी (धामणगाव आवारी) यांच्या फिर्यादीवरून आरोपी पती भगवान भाऊ हुलवळे (चैतन्यपूर,) याच्यावर अकोले पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याला न्यायालयाकडून सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. गुढीपाडव्याच्या दिवशी माझ्या मुलीची हत्या करण्यात आल्याचे विवाहितेच्या वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे. १९९५ मध्ये धामणगाव आवारी येथील सविताचा विवाह चैतन्यपूर येथील भगवान भाऊ हुलवळे याच्यासोबत झाला. काही दिवस दोघांचा संसार चांगला चालला.
मात्र, कालांतराने दोघांमध्ये मतभेद होत राहिले. गेल्या काही दिवसांपासून दोघांचा वाद विकोपाला गेला. गुढीपाडव्याच्या दिवशी (२५ मार्च) सकाळी सविता गाईच्या गोठ्यात गेल्यानंतर तिला गाईने लाथ मारल्याने तिचा मृत्यू झाल्याची माहिती मृत मुलीचे वडील पुंजा आवारी यांना सांगण्यात आली.
परंतु या दोघांचे गायीच्या गोठ्यात दूध काढताना वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात टणक वस्तुने मारले. यातच तिचा मृत्यू झाला. यापूर्वी अकस्मात मृत्युची नोंद झाली होती. परंतु याप्रकरणी विवाहितेचे वडील यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली.
त्यानंतर पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी संबंधित आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक दीपक ढोमणे यांनी भगवान हलवळे यास अटक केली.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com