अहमदनगर ब्रेकिंग : अहमदनगर मध्ये हे आहेत कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,29 जून 2020 :  अहमदनगर शहरात कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने शहरात नवे कन्टेन्मेंट झोन आणि बफर झोन करण्यात आले असून या ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे.

कन्टेन्मेंट झोनमधील सर्व अस्थापना, दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. तर बफर झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवेतील अस्थापना व दुकानेच चालू राहणार आहेत.

कन्टेन्मेंट झोन मधील सर्व अंतर्गत रस्ते पत्रे लावून बंद करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेसाठी कोंड्यामामा चौकातील हॉटेल राजेंद्र परिसरात प्रवेशद्वार ठेवण्यात येणार आहे.

आडतेबाजारमध्ये कोरोना रुग्ण आढळू लागल्याने आज जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके, महापालिका आयुक्‍त श्रीकांत मायकलवार, शहर अभियंता सुरेश इथापे, उद्यान विभाग प्रमुख शशिकांत नजन आदी उपस्थित होते.

कन्टेन्मेंट झोन – 

कोठला, ब्राम्हण कारंजा, अंबिका हॉटेल, हेमराज मेडीकल, रामचंद्रखुंट, अनिलकुमार पोखरणा ऍण्ड सन्स, तपकीर गल्ली, शामसुंदर रामचंद्र हेडा, रांका ट्रेडर्स, आडते बाजार कोपरा,

जगदाळे ज्वेलर्स, गंजबाजार, मालु पेंटस, मोहन ट्रंक डेपो, एस.एस मेहेर, फुटाणे गल्ली, संचेती साडी, पोपटानी एजन्सी, पाचलिंब गल्ली, कुबेर मार्केट, दाळमंडई, मिरा मेडीकल चौक, बॉम्बे फर्निचर, सीपी मुथ्था, ग्राहक भांडार चौक, राजेंद्र हॉटेल ते ब्राम्हण कारंजा.

बफर झोन – 

शनिगल्ली, झेंडीगेट, पोखरणा हॉस्पीटल सुभेदार गल्ली, नालबंदखुट, पिजार गल्ली पारशाखुट, जुना कापडबाजार, गंजबाजार, मोचीगल्ली, सारडागल्ली, कापडबाजार, शहाजीरोड,

तांबटकरगल्ली, तेलीखुंट पॉवर हाउस, नालामस्जीद, स्मिता मेडीकल, तेलीखुट, सर्जेपुरा चौक, मनपा शाळा, बेलदार गल्ली, मक्का मस्जीद, जे.जे.गल्ली, कोंडयामामा चौक, राज चेंबर, कोठला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24