अहमदनगर ब्रेकिंग : अत्यंत संतापजनक माहिती समोर,’ह्या’नेत्याच्या शाळेतील…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,14 सप्टेंबर 2020 :- लॉकडाउनच्या कालवधीमध्ये वनकुटे येथील जंगलामध्ये बेवारस स्थितीत आढळून आलेले कडधान्ये, मिठ तसेच तांदुळ जि. प. चे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्या अधिपत्याखालील वनकुटे येथील प्रगती विदयालयाच्या शालेय पोषण आहारातील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी दोघा मुख्याध्यापकांवर ठपका ठेवण्यात आला असून नुकसान झालेल्या कडधान्ये, तांदूळ तसेच मीठीचे 30 हजार 311 रूपये त्यांच्याकडून वसुल करण्यात यावेत असा अभिप्राय देण्यात आला आहे. या पोषण आहारामध्ये अपहार झाल्याचेही अहवालात नमुद करण्यात आले आहे.

दि. 3 एप्रील रोजी वनकुटे येथील जंगलात बेवारस स्थितीमध्ये तांदूळ, वाटाणा, मुगदाळ, चवळी व मिठ आढळून आल्यानंतर तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. प्रसार माध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसिलदार ज्योती देवरे तसेच गटविकास अधिकारी किशोर माने यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

त्यावेळी करण्यात आलेल्या पंचनाम्यात 300 किलो तांदूळ, 20 किलो वाटाणा, 20 किलो मुुगदाळ, 20 किलो चवळी, 1 किलोच्या 21 मिठपुडया असल्याचे आढळून आले होते. हे कडधान्य, तांदूळ तसेच मिठ शालेय पोषण आहारातील असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिसरातील जिल्हा परिषद शाळा

तसेच माध्यमिक शाळांतील पोषण आहाराच्या मालाची तपासणी करण्यात आली होती. चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालात अनेक गंभीर बाबी नमुद करण्यात आल्या आहेत. बेवारस स्थितीत आढळून आलेला तादूळ, वाटाणा, चवळी, मुगदाळ व मिठ हा माल शालेस पुरवठा होणा-या शालेय पोषण आहारातील आहे.

बेवारस टाकलेल्या मालातील तांदूळ हा 2015, 16 व 16,17 या वर्षातील तर मिठ 2015 सालातील आहे. बेवारस टाकलेल्या मालासारखा माल प्रगत विदयालय वनकुटे यांच्या साठा खोलितील चवळी, मुगदाळ, मीठ, तांदूूळ व वाटाणा बंद खोलित पडवीसमोर पडलेला दिसून आला.

प्रगत विदयालयात शिल्लक ठेवलेल्या मालाची शिक्षण विभाग कार्यालयास कोणत्याही प्रकारची माहीती न देता खराब माल नष्ट करण्याची परवाणगी न घेेता परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे दिसून येते.

हा माल स्थानिक परिसरातील प्रगत विदयालय वनकुटे शाळेन निर्जन स्थळी बेवारस स्थितीत टाकून दिलेला आहे. तसे वृत्त सोशल मिडीया तसेच वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले होते.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24