अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कौटुंबिक कलहातून दोन वर्षांच्या चिमुरडीला सोबत घेऊन आईची देवहंडी लघू पाटबंधारे प्रकल्पात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना अकोले तालुक्यातील धामणवन येथे सोमवारी (१ जून) पहाटे सहाच्या सुमारास घडली.
कांचन पंकज सोनवणे (वय २२) व स्वरा पंकज सोनवणे (वय २) असे मृत व्यक्तींची नावे आहेत. धामणवण येथील पंकज सोनवणे याच्याबरोबर शिसवद तालुका अकोले येथील कांचनचा विवाह झाला.
कांचनच्या पतीने तिला शेततळे बांधण्यासाठी ५० हजार रुपये माहेरून आणण्यासाठी तगादा लावला. त्यामुळे कांंचन मानसिक तणावाखाली होती.
इतके पैसे आई-वडिलांनी कोठून आणायचे हा प्रश्न तिच्यासमोर पडला. या कारणावरून तिला घरात त्रास दिला जात होता.छळाला कंटाळून
तिने आपली दोन वर्षाची मुलगी स्वरा हिलाही सोबत घेत १ जून रोजी पहाटे सहापूर्वी देवहंडी लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या पाण्यात उडी मारून मुलीसह जीवनयात्रा संपवली.
कांचन व स्वरा या मायलेकी घरातून निघून गेल्यानंतर सासरच्यांनी त्यांचा शोध सुरू होता. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर कांचनच्या माहेरच्या मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यामुळे दोन्ही कुटुंबीयांकडून त्यांचा शोध सुरू झाला. धामणवण प्रकल्पाच्या पाण्यात दोघींचे मृतदेह सापडून आले. त्यामुळे कांचनच्या माहेरच्यांनी रागाच्या भरात पंकज सोनवणे याच्या डोक्यात दगड घातल्याने त्यात तो गंभीर जखमी झाला.
याप्रकरणी निवृृत्ती दगडू सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शरद काशिनाथ कदम व मारुती काशिनाथ कदम (दोन्हीही रा. शिसवद, ता. अकोले) यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews