अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची हत्या करत मृतदेह उसाच्या शेतात फेकला !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नगर शहरातील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खुनाचे प्रकरण चर्चेत असतानाच काल पुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या शिवारात रमेश भिकाजी पंधरकर यांच्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे.

धक्कादायक म्हणजे टणक वस्तूने सदर मृत महिलेच्या डोक्यात मारुन खून करुन तो मृतदेह वरील ठिकाणी टाकून पुरावा नष्ट करण्याचा खळबळजननक प्रकार समोर आला आहे.

या घटनेने विसापुरसह श्रौगोंदा तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विसापूर येथील बाळू शिंदे, वय ५३, यांनी बेलबंडी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाळू शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने लता मधुकर शिंदे, वय ५६, रा. विसापूर या महिलेला डोक्याचे पाठीमागील बाजूस टणक वस्तूने

मारुन खून करून उसाच्या शेतात मृतदेह टाकून पुरावा नष्ट केला. दरम्यान घटनास्थळी पोलिसांनी भेट दिली असून या प्रकरणातील आरोपींचा बेलवंडी पोलीस शोध घेत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24