अहमदनगर Live24 ,16 मे 2020 :- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ पुंजाजी जगताप (३६ वर्षे ) यांच्यावर चाकूहल्ला झाला.
तीन वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. तळेगाव दिघे चौफुलीवर गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी एकाविरुद्ध संगमनेर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
१३ मे रोजी काशीनाथ जगताप यांनी समाज मंदिराजवळ दारु पिण्यास मनाई केल्याचा राग धरुन
अनिल रंगनाथ जगताप याने त्यांच्या छातीवर, कमरेजवळ, बरगडीवर वार केले.
काशीनाथ यांना तांबे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com