अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याच्या हल्ल्यात बालक ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- पाथर्डी शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या केळवंडी शिवारात रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास घराच्या पडवीत आजोबा समवेत झोपलेल्या

सक्षम गणेश आठरे (८ ) या बालकाला बिबट्याने उचलून नेत घरापासून सुमारे दोनशे मीटर अंतरावर असलेल्या तुरीच्या शेतात नेत ठार केले.

मृत सक्षमचे चुलते प्रदीप आठरे म्हणाले, आजोबा व नातू दररोज घराच्या पडवीत झोपतात. पहाटेच्या सुमारास बिबट्याने झडप घालून सक्षम याला उचलून नेले. अंगावर हात ठेवून झोपलेल्या नातवाचा हात जोरात निघताच आजोबा जागे झाले.

दृश्य पाहून त्यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थ मशाली, कुऱ्हाड, काठ्या घेऊन धावले. तास दोन तास शोध घेतला पण बिबट्या आढळला नाही.

सकाळी सहा वाजेच्या सुमारास वन विभाग,पोलिस कर्मचारी शोध घेत असता तुरीच्या शेतातून सुमारे बिबट्या पसार झाला.ज्या दिशेने बिबट्या आला त्याच्याजवळ शोध घेतला असता सक्षमचा मृतदेह आढळून आला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24