अहमदनगर Live24 ,15 जून 2020 : पारनेर तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे, येथील कोहोकडी गावच्या सतिश सुखदेव गायकवाड ( वय 27) या युवकाचे रविवारी रात्री बिबट्याने अपहरण केल्याची माहिती समोर आलीय.
याबाबत सविस्तर घटनाक्रम असा कि, कोहोकडी येथील सतिष सुखदेव गायकवाड हा युवक रविवारी रात्री शिरूर येथून कोहोकडी फाटा येथे आला होता.
मात्र तो घरी आला नाही म्हणून त्यांच्या कुटुंबातील लोकानी पोलिसांना फोन केला. त्याचा शोध घेतला असता कोहोकडी फाट्याजवळ पोलिसांना सतिशची गाडी रोडच्या कडेला पडलेली दिसली.
व त्या ठिकाणी बिबट्याचे पंजाचे निशाणा दिसून आले. थोड्या अंतरावर त्याचा बूट पडलेला दिसला. त्या ठिकाणाहून थोड्या अंतरावर त्याचा मोबाईल चालू अवस्थेत मिळून आला.
बुटा शेजारी जमिनीवर देखील बिबट्याच्या पायाचे ओरखडे दिसत होते. पोलिसांनी वन विभागास बोलावून घेऊन रात्रीपासून शोधमोहीम सुरू केली आहे.दरम्यान पोलीस आणि वन विभागाच्यावतीने शोध मोहीम सुरू असून आज दुपारपर्यत त्याचा तपासही लागलेला नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews