अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 : कोरोनाचा धोका कायम असल्यानं राज्यातील लॉकडाऊन 31 जुलैपर्यंत वाढविण्यात आल्याचे परिपत्रक राज्य सरकारने जारी केले आहे.
नगर जिल्ह्यातही त्याची अंमलबजावणी झाली आहे, याबाबतचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे.
जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सुधारीत आदेशाद्वारे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन घोषित केला आहे. पूर्वीप्रमाणेच सर्व नियम लागू राहणार आहेत.
नवीन आदेशात काही नियमांचे पालन करून सलून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी पाच या वेळेतच सुरू राहणार आहेत.
जिल्ह्यात आज आढळले १९ कोरोना बाधित.
जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या: १२०
मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या: १४
जिल्ह्यातील एकूण नोंद रुग्ण संख्या: ४४१
कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३०७
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews