अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-नगर तालुक्यातील दरेवाडी येथे प्रेमी युगुलाने विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. प्रेम प्रकरणातूृन ही घटना घडली असावी, असा पोलिसांना संशय आहे.
अजय सुरेश बडेकर (वय २३) व मानसी भिमा पाचारे (वय २२) असे मयत झालेल्या तरुण, तरुणीचे नाव आहे. रविवारी पहाटे तरुणीचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगताना मृतदेह आढळून आला होता.
दरम्यान विहिरीच्या काठावर तरुणीसह तरुणीच्या चपला आढळून आल्याने पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांनी विहिरीत गळ टाकून शोध घेतला असता दुपारी तरुणाचाही मृतदेह आढळून आला.
आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून पोलिस तपास करत आहे. सदर तरुण तरुणी यांच्यामध्ये मागील अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते अशी चर्चा आहे. मात्र तरुणीच्या घरातून त्यांच्या प्रेमसंबंधाला विरोध होता असे बोलले जात आहे.
शुक्रवारी दोघांनीही विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समजत आहे. शनिवारी सकाळी तरुणीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले.