अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची गळफस घेवून आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील अंबड येथील (मोठे दळ सुतारदरा) जंगलात तरूण प्रेमी युगलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

अंबड येथील मोठे दळ सुतारदरा येथील जंगलात दुपारी लहान मुले सिताफळ तोडण्यासाठी गेले असता त्यांना एका शिसवाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक तरुण व तरुणी दिसल्याने त्यांनी पोलीस पाटलांना कळविले.

अकोले पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व मृतदेह ताब्यात घेतले. तरुणाच्या अंगात चॉकलेटी रंगाचे जर्कीन, काळ्या रंगाची जिन्स पॅँट तर तरुणीच्या अंगात निळ्या रंगाचे कमिज व गुलाबी रंगाची सलवार आहे. मृ

तदेह कुजलेले असल्याने त्यांची ओळख पटत नव्हती. रात्री उशिरा तरुण अंबड गावातीलच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

याबाबत अबंड येथील पोलीस पाटील भाऊसाहेब कारभारी कानवडे यांनी अकोले पोलीस ठाण्यात खबर दिल्याने अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24