अहमदनगर ब्रेकिंग ! मामा-भाच्याचा खुनी थरार; मामा ठार भाचा जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :-श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगणमध्ये मामा-भाच्याचा खुनी थरार घडला. शेतीच्या वादातून झालेला हा भयानक प्रकार मामाच्या जीवावर बेतला. तर दुसऱ्या मामाच्या हल्ल्यात भाचा जखमी झाला.

याबाबत अधिक माहिती अशी: मांडवगण व बनपिंप्री परिसरातील एका वस्तीवर रात्री मामा (कानिफनाथ गांगुर्डे ) व भाचा (केदारे ) यांच्यात शेतीतून वाद झाले.

त्यातून मारामाऱ्या झाल्या आणि त्यात भाच्याने मामाच्या डोक्यात खोऱ्याचा दांडा घातला. यात कानिफनाथ गांगुर्डे (वय ६५) यांचा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान या प्रकारानंतर दुसऱ्या मामाने भाच्याला बेदम मारहाण केल्याने आरोपी भाचाही गंभीर जखमी आहे. भाचा केदारी हा नगरला उपचार घेत असून एक जण पोलिसांच्या ताब्यात आहे.

दरम्यान. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. सर्व प्रशासन ताच्या उपचारार्थ आणि या महामारीस कंट्रोलमध्ये आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. आणि समाजात दुसरीकडे अशी विघातक कृत्ये घडत असल्याचे चित्र आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24