अकोले : एक अल्पवयीन मुलगी आपल्या घरी जात असताना तिला रस्त्यालगतच्या शेतात नेऊन तिचा विनयभंग करणाऱ्याला अकोले पोलिसांनी अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपीचे नाव अजिंक्य दामोधर मालुंजकर असे आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, अल्पवयीन मुलीच्या आत्याने याबाबत फिर्याद दिली असून
त्यावरून अकोले पोलिसांनी अकोले तालुक्यातील उंचखडक खुर्द येथील अजिंक्य दामोधर मालुंजकर (वय २३ , साखर कारखान्यात हेल्पर) याच्या विरुद्ध गु.र.नं. व कलम- ११३/२०२० भादंवि कलम ३६३,३५४ (अ)(१)(१), ८,१२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी अजिंक्य मालुंजकर याने या अल्पवयीन मुलीस ‘घरी आजीकडे सोडून देतो’ असे सांगून मोटरसायकलवर बसवून उसाच्या शेतात नेऊन तुला कोरोणा झाला आहे,
असे सांगून मुलीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. सदर फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®