अहमदनगर ब्रेकिंग : विवाहितेची २ वर्षाच्या मुलीसह तलावात आत्महत्या !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 : शेततळे बांधण्यासाठी ५० हजार रुपये आणावे म्हणून विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ केल्याने २२ वर्षीय विवाहितेने आपल्या २ वर्षाच्या मुलीसह देवहंडी तलावात आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील धामणवन येथे घडली आहे.

घटना समजताच संतप्त नातेवाईकांनी विहितेचा पती पंकज निवृत्ती सोनवणे यांची धुलाई केल्याचे समजते. विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पती पंकज व सासू मंदाबाई निवृत्ती सोनवणे यांच्या विरूद्ध राजूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत राजुर पोलिसांत मयत विवाहितेचे वडिल मारुती काशिराम कदम ( रा.शिसवद, ता. अकोले) यांनी फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की, त्यांची मुलगी कांचन हिचा तीन वर्षापूर्वी पंकज निवृत्ती सोनवणे ( रा.धामणवन, ता. अकोले) याचेबरोबर विवाह झाला होता.

विवाहानंतर सहा महिने संसार सुखाचा सुरु होता. त्यानंतर शेतात शेततळे बांधण्यासाठी माहेरवरुन ५० हजार रुपये घेऊन ये अशी वारंवार मागणी करुन

कांचनचा शारिरीक व मानसिक त्रास देवून तिचा पती पंकज व सासू मंदाबाई निवृत्ती सोनवणे या दोघांनी तिला आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे.

छळाला कंटाळून कांचन ही दि.२ जुन रोजी सायंकाळी घरातून निघुन गेली होती. दुसऱ्या दिवशी कांचन (वय २२) व मुलगी स्वरा ( वय २) यांचे मृतदेह देवहंडी तलावात आढळून आल्याने त्यां दोघींनी आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

त्यावरून राजूर पोलिस ठाण्यात पती पंकज व सासु मंदाबाई सोनवणे यांच्याविरूद्ध भा.द.वि.कलम ३०६, ३०४(ब), ४९८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सासु मंदाबाई सोनवणे हिला अटक करुन अकोले न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

दुसरा आरोपी विवाहितेचा पती पंकज सोनवणे यास संतप्त नातेवाईकांनी मारहाण केल्याने त्याच्यावर नाशिक येथील सरकारी रूग्णालयात उपचार सुरु आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24