अहमदनगर ब्रेकिंग : मतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 सप्टेंबर 2020 :-अकोले तालुक्यात अल्पवयीन मतिमंद मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याने ती गर्भवती राहिली. पोलिसांनी एका आरोपीला यवतमाळ येथे अटक केली. हा प्रकार टाकळी ते गर्दणी शिवरस्त्यावर वीटभट्टी वस्तीवर घडला.

अन्य दोन आरोपींचा शोध पोलिस घेत आहेत, अशी माहिती पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी दिली. राहाता तालुक्यातील केलवड परिसरातून हे कुटुंब रोजीरोटीसाठी वीटभट्टीवर आले.

त्यांना १५ वर्षांची मतिमंद मुलगी आहे. बाहेरगावाहून अन्य काही तरुणही वीटकामासाठी आले होते. यातील तिघांनी या मुलीवर अत्याचार केले. हा प्रकार फेब्रुवारीत घडला. त्यानंतर मुलीचे कुटुंब त्यांच्या मूळ गावी निघून गेले.

काही दिवसांनी मुलीचे पोट दुखू लागले. तपासणी केल्यावर ती गरोदर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी मुलीचे समुपदेशन केल्यावर आरोपींची नावे निष्पन्न झाली.

आरोपी प्रवीण ऊर्फ अजित लक्ष्मण भोर (२५, कोलुरा, ता. दिग्रस, जि. यवतमाळ) असल्याचे समोर आल्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याला गजाआड करण्यात आले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24