अहमदनगर ब्रेकिंग : मटका बुकी झाले कोरोनाचे शिकार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,4 जून 2020 :  संगमनेर शहरातील मटका बुकीना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

येथील नवघर गल्ली येथे एक मटका चालविणाऱ्याला कोरोना झाल्याचे उघड झाले असून तो दुसर्‍या मटका बुकीच्या संपर्कात आला होता.

तो निमोण येथे जो व्यक्ती मयत झाला होता. त्याच्या संपर्कात हे लोक आल्याचे समोर येत आहे. मयत व्यक्ती देखील मटका चालवत असल्याचे बोलले जात आहे.त्यामुळे या मटका आड्ड्यावर नेमके कोण-कोण गेले होते.

यांच्यावर कोणाचा अंकुश आहे. याचा तपास आरोग्यविभाग आणि पोलीस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे.अन्यथा हा आकडे वाढता राहिला तर संगमनेर मध्ये फार भयानक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

संगमनेर शहरात आता कोरोनाने अर्धशतक पुर्ण केले असून लोक वास्तव माहिती समोर आणायला तयार नाहीत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून संगमनेरचे आरोग्य अधिक धोक्यात जाऊ लागले आहे.

विशेष म्हणजे यात अवैध व्यवसायीकांची फार मोठी साखळी कोरोनाने ग्रासली असावी असे बोलले जात असून आतापर्यंत संगमनेरात तीन मटका बुकींना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

ही बाधा कदाचिक निमोण येथील एका मयत व्यक्तीमुळे झाली असावी अशा शोध प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, यांच्यामुळे कोणाकोणाला बाधा झाली. हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24