अहमदनगर ब्रेकिंग : दुकानास आग लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नेवासा :- तालुक्यातील सोनई येथे आज पहाटे दुकानाला लागलेल्या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले.

याबाबत माहिती अशी की सोनई बाजारपेठेतील मनोज जनरल स्टोअर्स या दुमजली दुकानाला आज गुरुवारी पहाटे आग लागली.

या आगीत दुकानातील लाखो रुपयांचे सामान, फर्निचर जळून खाक झाले.

आगीवर नियंत्रण आणण्यासाठी मुळा कारखाना, ज्ञानेश्वर कारखाना व श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबांनी प्रयत्न केले.

दरम्यान अद्याप आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24