#अहमदनगर ब्रेकिंग : अल्पवयीन मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- कोपरगाव औद्योगिक वसाहत परिसरातील एका बंद खोलीत ओढणीच्या साह्याने एका अल्पवयीने मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि.26) सायंकाळी साडेसातच्या उघडकीस आली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, की पायल मोलचंद चव्हाण (वय 14, रा. औद्योगिक वसाहत, संवत्सर शिवार ता. कोपरगाव, मूळ रा. चाळीसगाव) या अल्पवयीन मुलीने आपल्या भावंडा समवेत दिवसभर अभ्यास केला.

सायंकाळी ती घरातून अचानक दिसेनाशी झाली. त्यामुळे तिची मोठी बहीण व भावाने तिचा शोध सुरू केला. यावेळी तिचे वडील औद्योगिक वसाहतीत एका कंपनीत कामावर गेले होते.

घरी आल्यानंतर त्यांनीही शोध घेतला असता, त्यांना जवळच्या एका बंद पत्र्याच्या खोलीत ओढणीने गळफास घेतलेल्या अवस्थेत पायल आढळून आली. त्यांनी तिला तातडीने खाली काढून कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

मात्र डॉक्‍टरांनी तिला मयत घोषित केले. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. तसेच अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24